शबनम न्यूज | प्रतिनिधी
विधान भवन येथे आज आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजना समितीची बैठक पार पडली.
अकोला जिल्हा भेटीच्या अनुषंगाने आढळलेल्या त्रुटींवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. समितीने संबंधित विभागीय सचिवांची साक्ष नोंदवली.
बैठकीस प्रधान सचिव (ग्रामविकास विभाग), अप्पर मुख्य सचिव (महसूल विभाग), उपजिल्हाधिकारी अकोला, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान अपूर्ण राहिलेल्या कामांचा आढावा घेऊन ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश समितीने दिले. याशिवाय, या कामांचा पुनश्च आढावा पुढील बैठकीत घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
तसेच, समितीच्या आगामी छत्रपती संभाजीनगर जिल्हा बैठकीच्या आयोजनासंबंधी आवश्यक सूचना देण्यात आल्या.