पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरात होणाऱ्या मेट्रो स्टेशनला भारतरत्न ,माजी राष्ट्रपती, ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातून होत आहे. मागणीची निवेदन मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना देण्यात आले.
डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम हे तरुणांसाठी सदैव प्रेरणास्थानी राहिले आहे व राहणार, त्यांचे कार्य आपल्या देशासाठी मोठे आहे त्यांचे संपूर्ण आयुष्य प्रेरणादायी राहिले आहे. अशा थोर व्यक्तीचे नाव आपल्या पिंपरी चिंचवड शहरात होणाऱ्या निगडी मेट्रो स्टेशनला दिले तर आपल्या शहरातील युवकांना त्यांच्या नावाने जास्तीत जास्त प्रेरणा मिळत राहील, त्यामुळे मेट्रो स्टेशनला डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
शिवसेना युवा सेनेचे पिंपरी उप विधानसभा प्रमुख निजाम महबूब शेख यांनी सदर मागणीचे निवेदन खासदार बारणे यांना दिले, यावेळी सोनू भाई शेख, आरिफ शेख, आयान शेख, करीम मुल्ला, सईद खान, अब्बास पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
निगडीतील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौक, ट्रान्सपोर्ट नगर, गणेशनगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळे गाव, पुनावळे, ताथवडे गाव, ताथवडे, भुमकर चौक, भुजबळ चौक, वाकड, विशालनगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकारामनगर, वल्लभनगर (वायसीएमजवळ), गवळीमाता चौक, भोसरी एमआयडीसी, वखार महामंडळ गोदाम चौक, पीआयईसी, मोशीतील भारतमाता चौक, चिंबळी फाटा, बर्गेवस्ती, कुरळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी, चाकण असा मेट्रो मार्ग असणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महा-मेट्रोकडून सादर करण्यात आला आहे.