spot_img
spot_img
spot_img

श्रीक्षेत्र टाळगाव चिखली येथे रंगणार भव्य दहीहंडी महोत्सव

शबनम न्यूज : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील श्रीक्षेत्र टाळगाव चिखली येथे भव्य दहीहंडी महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या दिमाखात साजरा होत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कुंदन गायकवाड व ब्रह्मा विष्णू महेश कबड्डी संघाचे अध्यक्ष संदीप निवृत्ती शेलार यांच्या वतीने सदर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षण हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती खरबंदा असणार आहे तसेच कीर्ती खरबंदा सोबतच रात्रीस खेळ चाले दोन फेम अभिनेत्री पौर्णिमा डे, जानू विना रंगच नाही फेम झेबा शेख, व नृत्यांगना मयुरी उतेकर यांच्या उपस्थितीत यंदाचा दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

 

सदर भव्य दहीहंडी महोत्सव शनिवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री क्षेत्र जळगाव चिखली येथे संपन्न होत आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी सदर दहीहंडी महोत्सवात सहभाग घेऊन महोत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन या दहीहंडी महोत्सवाचे आयोजक माजी नगरसेवक कुंदन गायकवाड व ब्रह्मा विष्णू महेश कबड्डी संघाचे अध्यक्ष संदीप निवृत्ती शेलार यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!