शबनम न्यूज | प्रतिनिधी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव, आळंदी. या ठिकाणी सुमन फाउंडेशन आळंदी व शीरचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरक्षित गुंतवणूक’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. संतोष कदम यांनी कार्यक्रमाचा उद्देश आणि भूमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या डॉ. सारिका लोहाना यांनी गुंतवणूक म्हणजे काय? गुंतवणुकीचे कोणते महत्त्वपूर्ण प्रकार आहेत. शेअर मार्केट,गोल्ड मार्केट, म्हणजे काय? इत्यादी बद्दल सविस्तर विवेचन करून कोणतीही गुंतवणूक दबावाखाली न करता स्वमर्जीने केली पाहिजे कारण गुंतवणूक ही आयुष्याची शिदोरी असते प्रत्येक व्यक्तीने उत्पन्नाच्या 30% रक्कम गुंतवली पाहिजे. उत्पन्न आणि गुंतवणूक याचा अत्यंत जवळचा संबंध असून उत्पन्नाच्या प्रमाणात प्रत्येकाने गुंतवणूक करणे आधुनिक काळात कशी गरज आहे हे विविध उदाहरणांचे दाखले देत सखोल मार्गदर्शन केले. गुंतवणूक करतांना आपली फसवणूक होणार नाही तसेच आपला फायदा सुद्धा योग्य वेळी झाला पाहिजे असे मत व्यक्त करून गुंतवणूक करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.आर. मोकाटे यांनी गुंतवणुकीचा फायदा काय आहे. गुंतवणूक ही फसवणाऱ्या कंपनीमध्ये न करता शासकीय मान्यता असणाऱ्या कंपनीमध्येच करण्याची आवश्यकता व्यक्त करून सर्वांना गुंतवणुकीचे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्रवीण भावे- कार्यालयीन अधीक्षक,डॉ. पांडुरंग मिसाळ – मराठी विभाग प्रमुख,प्रा. माणिक कसाब- राज्यशास्त्र विभाग प्रमुख,प्रा. संजीव कांबळे -राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा.प्रफुल्ल जाधव- बी.बी.ए.सी.ए. विभाग प्रमुख, प्रा. दिपाली ताम्हाणे – वाणिज्य विभाग प्रमुख,प्रा. सविता मानके,प्रा. दिपाली सोनवणे,प्रा.यशोदा आनेराव,प्रा. पूजा खवले प्रा.रोहित कांबळे, इंग्रजी विभाग प्रमुख,प्रा.महेश म्हसागर, डॉ. देवानंद गोरडवार – सांस्कृतिक विभाग प्रमुख,प्रा. प्रभाकर गायकवाड,प्रा.रूपाली औटे,प्रा.पूजा खेडकर, प्रा.संदीप वाळुंज,सौ.वर्षा ताजने, सौ.नेहा लांडगे, इत्यादी विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा परमेश्वर भत्ताशे – अर्थशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. सुजाता गिरी यांनी मानले.