पिंपरी, – पिंपरी चिंचवड महापालिकेचे दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे यांना जयंतीनिमित्त त्यांना महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील प्रतिमेस तसेच निगडी येथील माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहर अभियंता मकरंद निकम,माजी नगरसदस्या सुमन पवळे, अनुराधा गोरखे,कमल घोलप, शर्मिला बाबर,विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,सामाजिक कार्यकर्ते संतोष कवडे,अनिता लांडे,प्रदीप पाटील,ओंकार पवळे,लव धुमाळ, विठ्ठल झोडगे,विजय गांगर्डे, राजाराम राऊत
आणि महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.