शबनम न्यूज | प्रतिनिधी
दि.२५ मार्च पिंपरी चिंचवड शहरातील आदित्य इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित उन्हाळी क्रीडा शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. शिबिरात विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तसेच त्यांना शारीरिक क्षमता आणि खेळातील तंत्र शिकवण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटनाच्या वेळी स्कूलच्या मुख्याध्यापिका शितल पाटील यांनी शिबिराचे महत्त्व सांगितले आणि सर्वांना उत्साहाने सहभाग घेण्याचे आवाहन केले. शिबिरातील क्रीडा प्रकारामध्ये अथलेटिक, क्रिकेट, कराटे, योगा, एरोबिक्स, रायफल शूटिंग इत्यादी विविध क्रीडा प्रकार तसेच चित्रकला, झुंबा, गायन इत्यादी कला प्रकाराचा समावेश होता.
शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते, तसेच प्रशिक्षकांनी त्यांना खेळाच्या तंत्राबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडा कौशल्यांचा विकास केला आणि नवे मित्र बनवले.शिबिराच्या समारोप वेळी उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट्स व चित्रकलेचे साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.
समारोप प्रसंगी राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू आदित्य स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. शितल पाटील मॅडम यांनी शिबिरामध्ये शारीरिक शिक्षणाचे महत्त्व, टीमवर्क, आणि क्रीडायुक्त जीवनशैली, विद्यार्थ्याने लहान वयात सातत्यपूर्ण खेळ खेळल्याने शारीरिक फिटनेस वाढेल व विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास होईल याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या समारोप प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वितेसाठी क्रीडा मार्गदर्शक रविराज गाढवे, सौ. दीप्ती शेटे, चित्रकला प्रशिक्षक सौ.सुमती मेत्रे, म्युझिक डान्स निशाद सर, प्रियंका मॅडम, तसेच सौ. शिल्पा तांबे, सौ. राजश्री काळे, सर्व शिक्षक वृंद यांचे आभार व्यक्त करण्यात आले. सौ. प्राजक्ता जोशी मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.