शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी : काल यशश्री महिला मंडळाचा रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करण्यात आला. महिला मंडळामध्ये एकूण १०० सभासद आहेत.
मंडळाच्या २५ वर्षांच्या कामकाजा बद्दल अध्यक्षा अलका धोकटे यांनी माहिती दिली.
मंडळाची स्थापना ते आता पर्यंत ज्या सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक यांनी सहकार्य केले अशा सर्वांचा सत्कार करण्यात आला.
या मध्ये माजी नगरसेवक उत्तम केंदळे, सुमनताई पवळे, कमलताई घोलप, शशीकिरण गवळी, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कोलते, दत्त मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग पालांडे व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उपस्थीत होते.
“मंडळाची २५ वर्ष“ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली, त्याला सभासदांनी उदंड प्रतिसाद दिला आणि विजेत्यांना बक्षीसही देण्यात आले.
यावेळी जुन्या हिंदी मराठी गाण्यांच्या ऑर्केस्ट्राने कार्यक्रमाची सुरवात व सांगता करण्यात आली.
मंडळाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी अलका धोकटे, सुनिता देसाई, अलका मुथा, दमयंती गायकवाड, वैशाली जिडेवार, वीणा गोडसे, शैला टांकसाळे, उषा दहाड, कुमुदिनी राऊत, कल्पना पालांडे या सर्व कमिटी मेंबर्सने परिश्रम घेतले.