शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहराचे ज्येष्ठ नेते तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष व पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष तथा माजी विरोधी पक्ष नेते भाऊसाहेब भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
सदर शिबिर शनिवार (दि. २६) जुलै २०२५ रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत कै. सोपानराव भोईर विरंगुळा केंद्र, बिजलीनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदर शिबिरात मोफत मोतीबिंदू तपासणी, काचबिंदू तपासणी, पडद्याची शस्त्रक्रिया त्याच प्रमाणात दंत तपासणी मध्ये मोफत दात काढणे, रूट कॅनल ,सिमेंट भरणे अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर शिबिर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या सहकार्याने होत असून, जास्तीत जास्त नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाऊसाहेब भोईर मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.