शबनम न्यूज | प्रतिनिधी
महावितरण विभागाकडून चुकीचे बीज बिल देऊन फसवणूक करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष म्हात्रे यांनी केला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर येथे राहणारे धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष म्हात्रे यांना चुकीच्या वीज बिलाद्वारे जास्तीचे रक्कम भरण्यासाठी प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचं सांगितलं आहे.
महावितरण विभागाकडून देण्यात येणारा वीजबिलात अवघ्या एका महिन्यात 1183 चा वापर दाखविण्यात आला व बिलाची रक्कम 26 हजार इतकी आहे, परंतु प्रत्यक्ष मीटर ट्रेडिंग नुसार वापर 300 युनिट पेक्षा कमी आहे.
हे एक सरळ सरळ आर्थिक शोषण आणि फसवणुकीचा प्रकार आहे. हे केवळ चुकून झाले नाही तर मागील काही महिन्यांपासून महावितरणचे कर्मचारी सर्रास अशा प्रकारे नागरिकांची लूट करत आहेत, सतत चुकीचे रीडिंग मनमानी बिलिंग वाऱ्यावर चालणाऱ्या प्रणालीमुळे हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत, असा आरोप संतोष म्हात्रे यांनी आपल्या निवेदनात केला आहे/ त्यांनी आपली निवेदन पिंपरी महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे दिले आहे.
तसेच यासाठी बेजबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन व सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे.
संतोष म्हात्रे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की,
- माझं सद्य वीजबिल तात्काळ रद्द करून नवीन, खरी रीडिंग असलेलं बिल पाठवण्यात यावं.
- ज्या कर्मचारी/अधिकाऱ्यांनी हे बनावट बिल तयार केलं आहे, त्यांना सेवेतून बडतर्फ करावं. “निलंबन” पुरेसं नाही – सेवेतून कायमचं काढून टाकावं.
- त्यांच्यावर फसवणूक, आर्थिक शोषण, लोकसेवेतील गैरवर्तन याखाली गुन्हा दाखल करावा.
- MSEB चे वरिष्ठ अधिकारी या प्रकाराकडे कानाडोळा करत असतील, तर त्यांच्यावरही कारवाईची मागणी मी ऊर्जामंत्र्यांकडे करणार आहे.
- सर्व सामान्य ग्राहकांना संरक्षण मिळावे यासाठी त्वरित ऑडिट व थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन सुरू करावे.
जर वरील मागण्या ७ दिवसांच्या आत मान्य कराव्या.