पिंपरी चिंचवड प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रहाटणी परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
रहाटणी परिसरातील राष्ट्रवादीपक्षाचे सागर कोकणे, सौ अश्विनी ताई तापकीर, सुमित डोळस व सागर कोकणे यांच्या वतीने सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.. या शिबिराचे उद्घाटन चिंचवड विधानसभा मतदार संघाचे नेते तथा माजी विरोधी पक्ष नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक खंडू शेठ कोकणे ,माजी नगरसेवक सतीश दरेकर, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, माजी नगरसेवक एडवोकेट गोरक्ष लोखंडे, चिंचवड विधानसभेच्या महिला अध्यक्ष संगीता कोकणे, भाजपचे नेते गणेश नखाते, सुनील गोडांबे मोहन शेठ नखाते , माऊली जाधव, रामदास काळभोर ,काळूराम कवितके, राजेंद्र पवार यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.