शबनम न्यूज | प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिश्कीलपणे “सत्ताधारी पक्षात येण्याचे” आमंत्रण दिले होते. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. ही भेट विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या कार्यालयात झाली. त्यांची ही भेट सुमारे २० मिनिटे चालली.
दरम्यान शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) एक्स अकाउंटवर या भेटीबाबत माहिती देण्यात आली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज विधानभवन येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील विविध संपादकांनी हिंदीसक्तीविरोधात लिहिलेल्या लेखांचे संकलित ‘हिंदी हवी कशाला?’ पुस्तक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना भेट दिले.”