spot_img
spot_img
spot_img

PUNE : महापालिकेतील वाढीव दराच्या घनकचरा निविदा रद्द!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

‘पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित निविदा प्रक्रिया पाच ते सात टक्के जास्त दराने आल्याने संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही,’ अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.

घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रक्रियेतील अनियमिततेबाबत खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाजपचे भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार बापूसाहेब पठारे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मिसाळ यांनी ही माहिती दिली.

राज्य शासनाने महानगरपालिकेला या निविदा प्रक्रियेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया रद्द केली आहे. या निविदा प्रक्रियेमुळे महानगरपालिकेला कोणतेही थेट आर्थिक नुकसान झालेले नाही. मात्र, निविदा प्रक्रियेदरम्यान झालेला प्रशासकीय खर्च कोणाकडून वसूल करायचा याबाबत महापालिकेला निर्देश दिले जातील.तसेच लोकप्रतिनिधींना विशिष्ट निविदांबाबत काही शंका असल्यास किंवा कुठल्या निविदांची सखोल चौकशी आवश्यक आहे, असे वाटत असल्यास त्यांनी संबंधित माहिती देण्याचे आवाहनही मिसाळ यांनी यावेळी केले. संबंधित प्रकरणांमध्ये चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!