पिंपरी चिंचवड प्रतिनिधी-
पिंपरी परिसरातील रखडलेली विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर हिरानंद उर्फ डब्बु आसवानी यांनी महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
त्यांनी आपल्या दिलेले निवेदनात नमूद केले आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत ते खड्डे आधुनिक पद्धतीने लवकरात लवकर भरून घेण्यात यावेत याबाबत संबंधित विभागात सूचना देण्यात याव्यात.
पिंपरी परिसरातील प्रभाग क्रमांक 21 मध्ये साफसफाई ची कामे वेळोवेळी होत नाहीये सगळीकडे दुर्गंधी पसरते त्याच्या देखील परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो रात्रीच्या वेळेस होणारी साफसफाई होत नाहीये असेही त्यांनी आपल्या निवेदनातून आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
प्रभागात कचरा उचलणारी गाडी वेळेनुसार येत नाही दोन-तीन दिवस कचरा तसाच पडलेला असतो त्यामुळे संबंधित ठेकेदार कंपनीस व अधिकारी कर्मचारी यांना याबाबत सूचित करावे.
सिंधी बांधवांचा चालीहो उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेची कामे त्वरित करा.
सिंधी समाज बांधवांचा चालीहो हा उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 16 जुलै ते 25 ऑगस्ट या दरम्यान साजरा होत आहे हा उत्सव मोठ्या उत्साहात पिंपरी परिसरात साजरा केला जातो सदर उत्सव हा चाळीस दिवसांचा असल्याने पिंपरी परिसरात स्वच्छतेची कामे तत्पर करण्यात यावी, अशी मागणी डब्बू आसवानी यांनी केली आहे याबाबत नियोजनात त्यांनी नमूद केले आहे की, सदर उत्सव चाळीस दिवस चालतो पिंपरी नदी घाट येथील असलेल्या झुलेलाल मंदिर येथे हा उत्सव साजरा होत असतो तरी सदर नदी घाट येथील संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात यावा हा परिसर नेहमी अस्वच्छ राहतो वारंवार तक्रार देऊनही मनपा वतीने येथील स्वच्छतेची कामे होत नाहीत तरी संबंधित विभागाला सूचना देऊन सदर उत्सवाच्या निमित्ताने या संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात यावी व तसे आदेश संबंधित विभागाला देण्यात यावे अशी मागणी माजी उपमहापौर हिरानंद उर्फ डब्बा आसवानी यांनी केली आहे.