शबनम न्यूज | प्रतिनिधी
परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन मध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीचे अवचित साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राजर्षी शाहु प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.
यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास माननीय श्री योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला व परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल कुरणे यांनी गुप्ता साहेबांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रीय नेते स्वराज्य क्रांती सेना पॅंथर आर्मी डॉक्टर राजेंद्रसिंग वालिया,संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोष एस.आठवले, दिगंबर कुलकर्णी व फाउंडेशनचे सभासद व पँथर आर्मी चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.