शबनम न्यूज
सांगवी:- मोठ मोठ्या शहरातील प्रदूषण कमी करायचे असेल तर प्रत्येक भागात झाडे लावणे गरजेचे आहे. अनेक धर्मादायी संस्था वृक्षारोपण करतात पण नंतर झाडांचे संवर्धन केले जात नाही. त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे सातारा मित्र मंडळ सांगवी, नवी सांगवी ,पिंपळे गुरव पुणे च्या वतीने कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर व नूतन माध्यमिक विद्यालय सांगवी च्या मैदानवर आज जंगली झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले व त्याचे संवर्धन ही करण्यात येणार आहे हे खूप चांगले काम आहे ,असे मत शितोळे शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी व्यक्त केले. कै.सौ.शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर नेहमी नवीन नवीन उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते . आणि सातारा मित्र मंडळ सांगवी ने हा उपक्रम आमच्या शाळेत राबविला त्याबद्दल मी मुख्याध्यापक या नात्याने त्यांचे मनापासुन अभिनंदन करतो. मंडळाने असेच सामाजिक उपक्रम राबवावे अशा मी त्यांना शुभेच्छा देतो . यावेळी झाडे लावण्याचे महत्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितले.
याप्रसंगी वृक्षमित्र टाटा मोटर्स चे कर्मचारी मा.पांडुरंग सुतार व प्रकाश चव्हाण यांनी झाडे लागवडीसाठी दिली.यावेळी कै.शकुंतलाबाई आनंदराव शितोळे शाळा व नूतन माध्यमिक विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी झाडे लावण्यासाठी मोलाची मदत केली. याप्रसंगी सातारा मित्र मंडळाचे सचिव सोमनाथ कोरे,कार्याध्यक्ष संजय चव्हाण, सदस्य प्रकाश चव्हाण, किरण बागल, राहुल पवार शाळेचे शिक्षक हेमलता नवले, सीमा पाटील, दत्तात्रय जगताप, स्वप्नील कदम,विद्यार्थी, विद्यार्थिनी पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमलता नवले व निवेदन आभार स्वप्नील कदम यांनी केले.