शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरात एका अठरा वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “मम्मी मी मोबाईल फोडून टाकतो, पुरावा राहणार नाही. मला मरायचं आहे, मी विष प्यायलो आहे.. मी लोकेशन पाठवलं, माझा मृतदेह घेऊन जा..” अशा आशयाची सुसाईड ऑडिओ आईला पाठवून एका अठरा वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. संजय कुमार विनोद कुमार राजपूत असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
17 जून रोजी देहू रोड पोलीस ठाण्यात संजय कुमार बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. शनिवारी त्याचा मृतदेह घोराडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी आढळून आला. मृतदेहाच्या जवळ विषारी औषधाची बाटली आढळली. संजय कुमारने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय, तसे शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे.
संजय कुमार हा पिंपरी चिंचवड परिसरात आपल्या कुटुंबासह राहतो. त्याच्या पश्चात आई-वडील आणि दोन बहिणी असं त्यांचं कुटुंब आहे. आत्महत्यापूर्वी संजय कुमारने म्हंटल होत कि, “ज्या प्रमाणे इतर लोक मरतात तसा मी ही मरेल…..आणखी काही बोलायचं नाही…माझ्या आई- वडिलांना एवढंच सांगायचं आहे की, माझ्या बहिणींना कुणी त्रास देऊ नका. मला काही नकोय…,केवळ माझ्या बहिणीची चिंता आहे. याव्यतिरिक्त ह्या जगात कुणाची चिंता नाही. दोन्ही बहिणींची चिंता आहे. त्यांना काही झालं नाही पाहिजे. त्यांच पालनपोषण चांगल व्हायला हवं. सुशिक्षित होऊन पुढे गेल्या पाहिजेत. माझं आयुष्य आता काही कामाच नाही.”