spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा…

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व योग विद्या धाम, पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल, मासुळकर कॉलनी, पिंपरी येथे सकाळी सामूहिक योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन महापालिकेचे उप आयुक्त पंकज पाटील आणि सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी योग विद्या धाम संस्थेचे प्रमुख प्रमोद निफाडकर, संस्था पदाधिकारी, योगप्रशिक्षक आणि शिक्षक वर्ग यांची देखील उपस्थिती होती.

योग सत्रात क्रीडा प्रबोधिनी उद्यमनगर, राजीव गांधी विद्यालय नेहरूनगर, तसेच इतर शाळांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यान सत्रांमध्ये उत्साहाने भाग घेतला. सत्रादरम्यान, योगाचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम, नियमित योगाभ्यासाचे फायदे आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व यावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात अंजली संधाने व त्यांच्या मंडळींनी योगनृत्य सादर केले, तर गुरुदेवी शेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सामूहिक योग प्रात्यक्षिक करून दाखवले. प्रमोद निफाडकर यांनी श्वसन व तणावमुक्तीसाठी विशेष योगासनांचे महत्व ‘स्वस्थ शरीर, शांत मन आणि समृद्ध समाज’ या संदेशावर आधारित योग जागरूकता‌ या सर्व विषयांवर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता कळमकर यांनी केले. यावेळी राजीव गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नलिनी जाधव, शिक्षिका वैशाली शेलार, विद्या मिसाळ, मनिषा वानखेडे, नंदा सोंडकर, माधुरी सायखेडे, सुरेखा कुसाळकर, शिक्षक संतोष मुनतोंडे, संतोष कपाळे क्रीडा प्रबोधिनी विद्यालय, उद्यमनगर विद्यालयाचे मुख्याध्यापक जयराम वायळ, शिक्षक ऋषिकांत वचकल, सोनाली पाटील, संग्राम मोहिते, राहुल मोरे, मनोज राऊत, प्रियांका पाटील, अक्षता बांगर तसेच महापालिकेच्या “क” क्षेत्रीय कार्यालयाचे – मुख्य आरोग्य निरीक्षक सतीश इंगेवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे छायाचित्रकार विलास साळवी, आरोग्य मुकादम दिलीप गायकवाड, व इतर कर्मचारी वर्ग आदी यावेळी उपस्थित होते.

 पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती…

या योग संगम कार्यक्रमात स्वच्छता जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आले. ओला व सुका कचरा, घरगुती घातक व सॅनिटरी कचरा यांचे विलगीकरण, प्लास्टिक पिशवीच्या वापराचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, तसेच कापडी पिशवीचा पर्याय यावर विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण केले. महापालिकेची घंटागाडी सेवा वापरण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

हा कार्यक्रम महापालिकेच्या क्रीडा विभाग, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त समन्वयातून यशस्वीपणे पार पडला. स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि योगप्रेमी नागरिक देखील यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!