शबनम न्यूज | प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेविका सौ.मनीषा प्रमोद पवार यांच्या वतीने 2 हजार कापडी पिशव्या थेरगाव परिसरातील प्रभाग क्रमांक 23 मधील नागरिकांना वाटप करण्यात आले.
पर्यावरणाचा समतोल साधावा प्लास्टिकचा वापर टाळावा, असा संदेश देत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनात सदर उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमोदभाऊ प्रकाश पवार, विनोदभाऊ प्रकाश पवार, विवेक तलोकर, रवि आरेकर, अनिल सूर्यवंशी, सूरज सुनार, राजू भंडारे, सुरेश सुनार, मंजुनाथ कांबळे, विनोद मिरगने, अजय कवचट, आदित्य देवराम, राणी शर्मा, संभाजी आडुसळे आदि उपस्थित होते.