spot_img
spot_img
spot_img

वैष्णवीला न्याय मिळावा ही आमची सर्वांची नैतिक जबाबदारी – आदिती तटकरे

पुण्यातील हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सर्व आरोपींना पोलिसांच्या वतीने अटक करण्यात आली. स्वर्गीय वैष्णवी हगवणे यांचे पालक कस्पटे कुटुंबीयांची आज महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी भेट घेतली, त्यांचे सांत्वन केले, यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना अदिती तटकरे यांनी म्हटले आहे की आपण वैष्णवीच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असून ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. या कठीण काळात आपण या कस्पटे कुटुंबांच्या पाठीशी असून संपूर्ण महाराष्ट्र शासन हे या कुटुंबाच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. वैष्णवीला न्याय मिळावा ही आमची सर्वांची नैतिक जबाबदारी आहे ,,ज्या व्यक्तींनी तिच्यावर अन्याय केला त्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत.

न्यायाच्या प्रक्रियेत कोणतीही तडजोड होऊ देणार नाही तसेच वैष्णवीचे बाळ सुखरूप असणे गरजेचे आहे त्यासाठी बाळाची चांगल्या डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व्हावी ; या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या घटनेवर बारकाईने लक्ष देत असून पीडित कुटुंबीयांना आम्ही नक्की न्याय मिळवून देऊ अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी दिली.

यावेळी महिला व बालविकास आयुक्त श्रीमती नयना गुंडे, श्रीमती वैशाली नागवडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नाना काटे, पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!