spot_img
spot_img
spot_img

खासदार श्रीरंग बारणे यांनी प्राधिकरणातील ‘ऑक्सिजन पार्क’ला दिली भेट

शहरातील इतर सोसायट्यांनी उद्यान विकसित करण्याचे आवाहन
पिंपरी – निगडी, प्राधिकरणातील सेक्टर नंबर २६ येथील ऑक्सिजन पार्क रेजीडेंसी असोसिएशनने विकसित केलेल्या ‘ऑक्सिजन पार्क’ उद्यानाला मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रविवारी भेट दिली. उद्यानात फिरून औषधी वनस्पती, पक्ष्यांची माहिती घेतली. शहरातील इतर सोसायट्यांनी अशा प्रकारचे उद्यान विकसित करण्याचे आवाहनही खासदार बारणे यांनी केले. 
यावेळी राजेंद्र बाबर, ऑक्सिजन पार्क रेजीडेंसी असोसिएशनचे अध्यक्ष  विजय कुमार नाईक, सचिव धनंजय कदम, देवेंद्र खडसे, सोनल कुमार सिंधी उपस्थित होते
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ऑक्सिजन पार्क रेजीडेंसी असोसिएशनने मोकळ्या जागेचा सदुपयोग केला आहे. या जागेत ऑक्सिजन पार्क विकसित केले आहे. या ठिकाणी अनेक औषधी वनस्पती आहेत. विविध प्रकारची १७०० झाडे आहेत. ही झाडे जगविण्यासाठी सामाजिक दायित्व निधीतून खर्च केला जात आहे. पाण्याची व्यवस्था केली जात आहे. झाडांची अतिशय व्यवस्थित, काळजीपूर्वक निगा राखली जाते. नागरी वस्तीमध्ये अतिशय सुंदर ऑक्सिजन पार्क विकसित केले आहे. याठिकाणी विविध प्रजातीचे पक्षीही येतात. रहिवाशांना पक्षु, पक्षाच्या अधिवासात राहण्यास मिळते. ऑक्सिजन पार्क या सोसायटीचा इतर सोसायट्यांनी आदर्श घ्यावा. अशा प्रकारचे उद्यान विकसित करावे. त्यामुळे जास्तीत जास्त वृक्षांची लागवड होईल. सोसायटी परिसरातील वातावरण पर्यावरणपूरक राहण्यास मदत होईल. मुलांना झाडे, पक्षांची माहिती होईल.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!