spot_img
spot_img
spot_img

राज्यस्तरीय शालेय स्पीडबॉल क्रीडा स्पर्धेत नॉव्हेल इंटर नॅशनल स्कूलचे घवघवीत यश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, महाराष्ट्र स्पीडबॉल असोसिएशन, पुणे जिल्हा व पुणे शहर स्पीडबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तर शालेय स्पीडबॉल क्रीडा स्पर्धा सन 2025-26 चे आयोजन दिनांक 10 ते 11 मे 2026 या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल, बारामती, पुणे येथे पार पडले. स्पर्धा सकाळी 10:00 वाजता सुरू झाल्या महाराष्ट्रातील विविध विभागांतील 250 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत कोल्हापूर विभाग, पुणे विभाग, लातूर विभाग, मुंबई विभाग, अमरावती विभाग, नाशिक विभाग व नागपूर विभाग यांचा सहभाग होता.

सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सहाय्यक क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते साहेब व तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले साहेब यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन स्पर्धेचे उद्घाटन केले. तसेच श्री ज्ञानेश काळे सर, महासचिव महाराष्ट्र स्पीडबॉल असोसिएशन, अशोक देवकर सर, रामचंद्र रणदिवे सर, पंचप्रमुख गणेश भोसले, ज्ञानेश्वर जाधव, तांत्रिक समिती प्रमुख गणेश म्हस्के सर, चंद्रकांत तोरणे सर श्री निरज इनामदार सर, यांनी पंच म्हणून काम पाहिले.

या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड येथील नॉव्हेल इंटर नॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी स्पीडबॉल स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत 16 खेळाडूंनी एकूण 12 सुवर्ण ,4 रौप्य पदके मिळवून शाळेचा तसेच पिंपरी चिंचवडचा नावलौकिक वाढवला.

🏅 स्पर्धेतील यशस्वी खेळाडू 🏅

Boys Under 14 Super Solo – सुवर्ण पदक
* विदित शिंदे – 8C

Girls Under 17 Single – सुवर्ण पदक
* ओवी व्यवहारे – 8C

Boys Under 17 Super Solo – सुवर्ण पदक
* निशांत तेजम – 8D

Girls Under 17 Relay – सुवर्ण पदक
* अंशिका सिंह – 8C
* आरोही मोरे – 8A
* सांक्रुती खोत – 6A
* प्राची आचाळकर – 8C

Boys Under 19 Super Solo – सुवर्ण पदक
* पृथ्वीराज पवार – 6C

Girls Under 19 Double – सुवर्ण पदक
* वेदिका पाटोळे – 6B
* पूर्वा मंधारे – 7B

Boys Under 19 Doubles – सुवर्ण पदक
* चिन्मय बारहाते – 7B
* श्रावण काचले – 7D

Boys Under 19 Relay – रौप्य पदक
* हर्ष कुलकर्णी – 7A
* साई ठाणगे – 7B
* ओम कोलते – 7C
* पार्थ मंगुटे – 8D

 

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आमदार श्री.अमित गोरखे सर,विश्वस्त विलास जेऊरकर,शाळा व्यवस्थापक डॉ .प्रिया गोरखे ,शाळा संसाधनप्रमुख श्री.समीर जेऊरकर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका मृदुला गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करून सर्व खेळाडू व क्रीडा विभागाचे विशेष कौतुक केले.
या सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री निरज इनामदार, सौ. प्रीती काळे, सौ. आकांक्षा घुले तसेच क्रीडा विभाग प्रमुख श्री विजय टेपुगडे यांचे मार्गदर्शन लाभले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!