spot_img
spot_img
spot_img

HSC Results : बारावीचा निकाल जाहीर ; यंदाही मुलींनी मारली बाजी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वीचा निकाल आज, शनिवारी (दि. २ मे, २०२६) दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अशा सर्व शाखांचे निकाल एकाच वेळी पोर्टलवर उपलब्ध होतील.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली असून बारावीच्या निकालाची टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले की, राज्यात यंदा कोकण विभाग आणि विद्यार्थ्यांपैकी मुलींनी निकालात बाजी मारली आहे.

विद्यार्थी खालीलपैकी कोणत्याही अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात…

  • mahahsscboard.in
  • https://results.digilocker.gov.
  • https://hscresult.mkcl.org/

बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी खालील सोप्या पद्धतीचा अवलंब करा:

१) वेबसाईटला भेट द्या: वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळांपैकी कोणत्याही एका लिंकवर क्लिक करा.

२) HSC Result 2026 निवडा: होमपेजवर ‘HSC Examination Result March 2026’ या लिंकवर क्लिक करा.

३) तपशील भरा: तुमचा ‘Seat Number’ (आसन क्रमांक) आणि ‘Mother’s First Name’ (आईच्या नावातील पहिली तीन अक्षरे) प्रविष्ट करा.

४) निकाल पहा: सर्व माहिती भरल्यानंतर ‘View Result’ या बटणावर क्लिक करा.

५) डाऊनलोड करा: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंट आउट (Print Out) किंवा डिजिटल प्रत सेव्ह करून ठेवा.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!