spot_img
spot_img
spot_img

पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आज, शुक्रवार, दि. ०३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, मा.महापौर श्री.योगेश बहल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले की, आजच्या दिवशी आपण केवळ महाराजांना अभिवादन न करता, त्यांच्याकडून मिळालेल्या नैतिकतेच्या आणि पराक्रमाच्या शिकवणीचा अवलंब करूया. शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर चालून, समृद्ध आणि समर्थ महाराष्ट्र घडवणे आणि भ्रष्टाचारमुक्त समाज, महिलांचा आदर आणि राष्ट्राप्रती निष्ठा हीच महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल. शिवराय नसले तरी त्यांची प्रेरणा अमर आहे, शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते, तर ते एक ‘विचार’ होते, त्यांचे धैर्य, बुद्धिमत्ता आणि प्रजाभक्ती आपल्याला नेहमी मार्गदर्शन करेल. आज या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा करूया आणि त्यांच्या स्वप्नातील समृद्ध, एकसंध आणि स्वाभिमानी भारत घडवण्यासाठी कटिबद्ध होऊया.

यावेळी ॲड. गोरक्ष लोखंडे म्हणाले की, महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून अत्यंत शिस्तबद्ध राज्यकारभार चालवला. ‘शत्रू कितीही बलाढ्य असला तरी आपल्या हेतू आणि उत्साहानेच त्याचा पराभव होऊ शकतो’ हा आत्मविश्वास त्यांनी मराठी माणसाला दिला. तसेच स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांची काळजी आणि सर्वधर्मसमभाव, ही त्यांच्या स्वराज्याची प्रमुख वैशिष्ट्ये होती. या युगपुरुषाला, रयतेच्या राजाला, छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथी निमित्त माझे कोटी कोटी प्रणाम..!

यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, शाम लांडे, विजय लोखंडे, मा.नगरसेवक ॲड गोरक्ष लोखंडे, राजेंद्र जगताप, मायला खत्री, बन्सी पारडे, नगरसेवक जितेंद्र ननावरे, नगरसेविका प्रतिक्षा लांघी-जवळकर, उद्योग व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार,अभिजीत आल्हाट, अकबर मुल्ला, गोरोबा गुजर, महीला सरचिटणीस निलम कदम, शहर सरचिटणीस गणेश गायकवाड, प्रदेश सरचिटणीस ज्ञानेशवर कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, सुरविंद्रसिंग बाला, सचिन गायकवाड, अभिजीत आपटे, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!