शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुण्यातील आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवार, 23 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5:25 वाजण्याच्या सुमारास कात्रज घाट बोगदा संपल्यानंतर पुण्याकडे येताना दुसऱ्या वळणावर एसटी बस आणि ऑटो रिक्षामध्ये भीषण अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, Maharashtra State Road Transport Bus MH 10 DT 2697 आणि Auto Rickshaw MH 12 GS 9695 या दोन वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. अपघातानंतर रिक्षामधील चार जण जखमी झाले. त्यांना तातडीने 108 रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघातात रिक्षाचालक हनुमंत रमेश हंगरगे (वय 42, रा. सुखसागर नगर, बिबवेवाडी) यांचा मृत्यू झाला.
तसेच खालील तिघेजण जखमी झाले आहेत :
1. राजेश इंगवले (वय 48, रा. गोकुळ नगर, कात्रज कोंढवा रोड)
2. दशरथ निरगुडे (वय 43, रा. अप्पर बिबवेवाडी)
3. शहाजी लक्ष्मण शिवदे (वय 41, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी)
दरम्यान, बस चालक जालिंदर विष्णु शिंदे (वय 53, रा. शेडगेवाडी, खानापूर, जि. सांगली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे.
या घटनेचा पुढील तपास Ambegaon Police Station करीत आहेत.




