spot_img
spot_img
spot_img

चिंचवडमध्ये SIR पुनर्निरीक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी आणि माहिती अद्ययावत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेले ‘विषय सखोल पुनर्निरीक्षण शिबिर (SIR Process)’ मोठ्या उत्साहात पार पडले. आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या विशेष प्रयत्नातून हे शिबिर शनिवारी (दि. 18 एप्रिल 2026) आणि रविवारी (दि. 19 एप्रिल 2026) आयोजित करण्यात आले होते.

या दोन दिवसीय शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मतदार यादीतील नावांची पडताळणी, दुरुस्ती आणि नव्या नोंदणीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. बी.एल.ओ. म्हणून कार्यरत शिक्षक व शिक्षिकांनी नागरिकांचे तपशील ऑनलाइन पद्धतीने मोबाईलद्वारे नोंदवून प्रक्रिया सुलभ केली.

या उपक्रमात प्रशासन आणि निवडणूक विभागाचे अधिकारी मनोज लोणकर उपस्थित होते. त्याचबरोबर नगरसेविका अपर्णाताई डोके, नगरसेविका मनिषाताई चिंचवडे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, संघटन मंत्री मधुकर बच्चे, प्रदेश सदस्य अजित कुलथे, उपाध्यक्ष रविंद्र देशपांडे, माजी नगरसेविका कांताबाई मोंढे, योगेश चिंचवडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या शिबिरामुळे मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत होण्यास मदत झाली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. नागरिकांनीही प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करत भविष्यात अशा शिबिरांचे आयोजन नियमितपणे करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!