spot_img
spot_img
spot_img

पुर्णानगर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने कृतज्ञता सोहळा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुर्णानगर ज्येष्ठ नागरिक संघ, पूर्णानगर यांच्या वतीने “कृतज्ञता सन्मान सोहळ्या” चे आयोजन करण्यात आले होते. समाजाप्रती उत्तरदायित्व बाळगत उदार हस्ताने मदत केल्याबद्दल उद्योजक अनिल।नेवाळे, सतीश बेंडे, संजय नाना पठारे, सतीश वाणी आणि मेजर सुरेश डोके यांचा विशेष सन्मान करण्यात आला. अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर या सर्वांनी अत्याधुनिक पाणपोई , जलकुंभ, पंखे , बैठक व्यवस्था आदींच्या स्वरूपात अक्षय दानाचे लोकार्पण केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अंकुश बापू सुद्रीक हे होते. माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे , कार्याध्यक्ष सुनील कदम, समाजिक कार्यकर्ते पप्पूशेठ लोढा यांची प्रमुख उपास्थिती होती.

कार्यक्रमाची प्रस्तावना कार्याध्यक्ष सुनील कदम यांनी केली. राजेंद्र घावटे व नारायण बहिरवाडे यांनी सन्मानित व्यक्तींचे कौतुक केले, अल्पावधीतच संघाने केलेली प्रगती व ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवलेल्या उपक्रमांची विशेष प्रशंसा केली.

कार्यक्रमाचे संयोजन डॉ. वसंत पुंजे, पप्पू लोढा व श्किसन बाभळकर यांनी उत्कृष्टरीत्या केले. संघाचे अध्यक्ष श्री अंकुश बापू सुद्रिक, सचिव डॉ. वसंत पुंजे व सहसचिव श्री फापाळे यांच्या हस्ते दानशूर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. कल्याण वाणी सर यांनी केले

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!