spot_img
spot_img
spot_img

युवक काँग्रेसचे ‘संविधान लीडरशिप प्रोग्राम’ अभियान सुरू

सोशल मीडिया कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने देशभरात राबविण्यात येणाऱ्या ‘संविधान लीडरशिप प्रोग्राम’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ पिंपरी-चिंचवडमध्ये उत्साहात पार पडला. सोशल मीडियावरील कार्यकर्ते, इन्फ्लुएन्सर्स आणि स्थानिक नागरिकांना मुख्य राजकीय प्रवाहात सामील करून घेण्याचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या अभियानाच्या माध्यमातून लोकशाहीच्या बळकटीसाठी सोशल मीडियाला ‘पाचवा स्तंभ’ म्हणून स्वीकारण्याची भूमिका युवक काँग्रेसने मांडली आहे. नागरिकांच्या समस्या, सरकारच्या धोरणांवर मते, तसेच स्थानिक प्रश्न आज मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडिया कार्यकर्त्यांना संघटित करून त्यांचे एक सक्षम नेटवर्क उभारण्याचा संकल्प या अभियानातून करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व अभियानाचे प्रभारी गौरव चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी तरुणांना मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. एक साधा मिस कॉल देऊन किंवा QR कोड स्कॅन करून नोंदणी करता येणार असून, हे अभियान संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले होते. यावेळी प्रदेश सचिव व शहर निरीक्षक सत्यजित बिरादार, उपनिरीक्षक विकास सुपणार, प्रदेश सचिव उमेश कंधारे, स्वप्निल बनसोडे, विशाल कसबे, अजिंक्य देसाई, मयूर रोकडे, शोएब कुरेशी, रोहित शेळके, जय ठोंबरे, अक्षय शिंगाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अभियानामुळे सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या तरुणांना संघटित व्यासपीठ मिळणार असून, त्यांच्या आवाजाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास युवक काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!