spot_img
spot_img
spot_img

१०६ व्या घटनादुरुस्ती म्हणजे महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाच्या नव्या युगाची सुरुवात : सुजाता पालांडे

शबनम न्यूज | प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ऐतिहासिक १०६ वी घटनादुरुस्ती करून ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ संमत केल्याबद्दल, त्याचे स्वागत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजप महिला मोर्चाच्या वतीने चाफेकर चौक येथे भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. “सशक्त नारी, सशक्त भाजपा” असा नारा देत हजारो महिलांनी या पदयात्रेत सहभागी होऊन महिला आरक्षणाच्या निर्णयाचा जल्लोष केला.
या पदयात्रेचे आयोजन भाजप महिला मोर्चा शहराध्यक्षा व माजी नगरसेविका सुजाताताई पालांडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि विधान परिषद आमदार उमाताई खापरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी, हस्ताक्षर मोहीम राबविण्यात आली. तसेच, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना धन्यवादाचे 5 हजार पत्र शहरातून पाठविण्यात येणार असल्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. 
या प्रसंगी बोलताना आमदार उमाताई खापरे म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना केवळ हक्क दिले नाहीत, तर त्यांना सन्मानाने राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. हा कायदा देशातील माता-भगिनींच्या प्रगतीसाठी क्रांतीकारक ठरेल.”
महिला मोर्चा शहराध्यक्षा सुजाताताई पालांडे म्हणाल्या की, “गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला महिला आरक्षणाचा प्रश्न मोदी सरकारने मार्गी लावून महिलांना त्यांचा घटनात्मक अधिकार मिळवून दिला आहे. लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण मिळाल्यामुळे आता धोरण निर्मितीमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग वाढणार आहे. ही पदयात्रा म्हणजे महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाच्या नव्या युगाची सुरुवात आहे.”
शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी सांगितले की, “नारी शक्ती वंदन कायदा हा केवळ आरक्षणाचा आकडा नसून तो महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे. मोदी सरकारने दिलेल्या या संधीमुळे आता महिला केवळ मतदार न राहता, देशाचे भविष्य घडवणाऱ्या ‘नेत्या’ म्हणून समोर येतील.”
चाफेकर चौक परिसरात निघालेल्या या पदयात्रेत महिला कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. हातात तिरंगा आणि ‘नारी शक्ती वंदन’ अधिनियमाच्या समर्थनाचे फलक घेऊन महिलांनी परिसर दणाणून सोडला होता. ९६६७१७३३३३ या क्रमांकावर मिस कॉल देवून महिला भगिनींनी या निर्णयाचे स्वागत करा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. 
या सोहळ्याला सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस मधुकर बच्चे, युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे, ऐश्वर्या बाबर, रोहिणी मांढरे, गायत्री तळेकर, स्वाती जाधव, दिपाली कलापुरे यांसह भाजपचे सर्व आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या. 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!