- पोलीस आयुक्तालयामार्फत सीनियर सिटीजन सर्विस ॲप
शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांनी शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सीनियर सिटीजन सर्विस ह्या ॲपचे निर्माण केले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना केंद्र सरकारच्या सर्व योजना आरोग्य मेडिकल सुरक्षा व पोलिसांची मदत तात्काळ मिळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या मोबाईल मध्ये अॅप डाऊनलोड करण्यासाठी मा. नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या पुढाकाराने व चिंचवड पोलीस स्टेशन यांच्या मदतीने ज्येष्ठ नागरिकांना सदर अॅप डाउनलोड करून देण्यात साठी शिबिराचे आयोजन केले.
चिंचवड पोलीस स्टेशनचे पीएसआय तुषार घुगरे यांच्यासह महिला पोलीस अंमलदार आरती भोर, रेश्मा गजरे, कीर्ती अंबरते, आशा बहुल यांनी सदर नागरिकांना मोबाईल मध्ये अॅप डाऊनलोड करून देत त्याची माहिती दिली. यामध्ये नागरिक यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला व याबद्दल पोलिसांचे आभार मानले.