शबनम न्यूज | प्रतिनिधी
निगडी परिसरातील उरुवेला हाउसिंग सोसायटीत घरगुती वादातून एका महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी सावत्र वडिलांनीच खून केल्याचा आरोप असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १२९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ११५(२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. २६/०२/२०२६ रोजी पहाटे सुमारे ३ वाजता फिर्यादीच्या राहत्या घरात घडली.
फिर्यादी साई मनोज राठोड (वय १६, शिक्षण, रा. घर नं. ११६, उरुवेला हाउसिंग सोसायटी, सेक्टर नं. २२, ओटास्कीम, निगडी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज बाळूभाई राठोड (वय ४९) यांनी घरगुती कारणावरून फिर्यादीच्या आई गायत्री राठोड (वय ३७) यांच्याशी वाद घालून हाताने मारहाण केली.
त्यानंतर फरशीवर पाडून त्यांच्या गळ्यातील ओढणीने जोरात गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर दि. २६/०२/२०२६ रोजी सकाळी १०:०६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास निगडी पोलीस ठाण्याचे सपोनि धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


