पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
काळेवाडी (पुणे) – मित्राच्या फर्निचरचे काम पूर्ण का केले नाही, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर नाकावर जोरदार बुक्का मारून नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याची घटना काळेवाडी परिसरात घडली.
या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी अटकेत आहे.
ही घटना २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता एस.पी. फर्निचर, जायका चाय शेजारी, पवना गार्डनजवळ, विजयनगर, काळेवाडी येथे घडली. फिर्यादी बजरंगलाल श्री निवास बंग (वय ३५, व्यवसायिक, रा. रहाटणी, पुणे) हे मित्राच्या फर्निचरच्या कामाबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता आरोपी सलीम मुसा पंजेशा (वय ४४, रा. कृष्णा कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) याने त्यांच्यावर हल्ला केला.
तक्रारीनुसार आरोपीने नाकावर जोरात बुक्का मारून नाकाचे हाड फ्रॅक्चर केले, तसेच हाताबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली.
या घटनेत आरोपीचा मुलगा व दुकानातील दोन अनोळखी इसमही सहभागी असल्याचे नमूद आहे. आरोपी क्रमांक १ सलीम पंजेशा अटकेत असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११७(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरव करीत आहेत.


