spot_img
spot_img
spot_img

चाकणमध्ये बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश; एक आरोपी अटकेत

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब

चाकण (उत्तर) – घरगुती वापराच्या ज्वालाग्राही गॅस सिलेंडरमधून विनापरवाना लहान सिलेंडरमध्ये गॅस भरत नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी चाकण उत्तर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

या प्रकरणी एक आरोपी अटक करण्यात आला आहे.

ही कारवाई २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास खंडोबामाळ ते बिड वस्ती रस्त्यालगत, खंडोबामाळ येथील परदेशी यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली.

पोलिस हवालदार भैरोबा मनोहर यादव (ब. नं. 1122, नेमणूक – चाकण उत्तर पोलीस स्टेशन) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासात आरोपी राजु रामचंद्र रजपुत (वय ३०, रा. खंडोबा मंदिर शेजारी, खंडेश्वर कॉलनी, खंडोबामाळ, चाकण) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना घरगुती गॅस सिलेंडरमधून लहान गॅस टाक्यांमध्ये गॅस भरत असल्याचे आढळून आले.

या कारवाईत सुमारे १६,१०० रुपयांचा गॅस जप्त करण्यात आला.

आरोपीच्या या कृत्यामुळे स्फोटाचा गंभीर धोका निर्माण होऊन नागरिकांच्या जीवितास धोका होऊ शकत होता. तसेच जीवनावश्यक वस्तू असलेल्या गॅसबाबत शासन व ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी बीएनएस कलम ३१८(४), २८७, जिवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७, तसेच पुरवठा व वितरण नियमन आदेश २००० चे कलम ३, ४, ५, ६, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरवडे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!