शबनम न्यूज | भोसरी
कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेले नाव वापरून बनावट मशीनची विक्री केल्याचा प्रकार मंगळवारी (२२ एप्रिल) एमआयडीसी भोसरी येथे उघडकीस आला. आदम हुसेन बेग (६३, रा. एमआयडीसी भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अब्दुल्ला नुरल्ला आवटी (२७, रा. पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी येथील अब्राहम मशीनरी अँड स्पेअर पार्टस् या दुकानाचे मालक अब्दुल्ला आवटी याने त्याच्या दुकानात व्यापाराच्या उद्देशाने क्रॉम्प्टन कंपनीच्या मूळ नावामध्ये बदल करून कॉम्प्टन असे केले. त्या नावाने मशीनरी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी साठा करून विक्रीसाठी ठेवल्या. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आदम बेग यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी कारवाई करत दुकानातून पाच लाख ५६ हजार ७०० रुपये किमतीच्या मशीनरी जप्त केल्या. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कण्ऱ्यात आला आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.