spot_img
spot_img
spot_img

उद्यापासून सांगवीत भरणार भव्य ‘पवनाथडी’ जत्रा!

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते होणार उद्घाटन२५ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ दरम्यान नागरिकांना खरेदीसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी…

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने महिला बचत गटांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘पवनाथडी’ जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम २५ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या जत्रेचे उद्घाटन २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर आयोजित या उपक्रमात नागरिकांना खरेदीसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवता येणार आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे तसेच विविध उपयुक्त वस्तूंचे स्वतंत्र स्टॉल्स येथे उभारण्यात आले असून, या माध्यमातून महिला उद्योजकतेला चालना मिळणार आहे. यासोबतच स्थानिक उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या उपक्रमात महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या विविध वस्तू, खाद्यपदार्थ आणि पारंपरिक हस्तकलेचे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

याशिवाय खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, शंकर मांडेकर, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे,  महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर तसेच नगरसदस्य,नगरसदस्या आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे , शहरातील नगरसदस्य, नगरसदस्या तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत.

पवनाथडी जत्रेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम

(सर्व कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता सुरु होणार आहेत.)

२५ फेब्रुवारी –  ‘महाराष्ट्राची मराठी बाणा’

२६ फेब्रुवारी – सुप्रसिद्ध होम मिनिस्टर कार्यक्रम

२७ फेब्रुवारी – ऑर्केस्ट्रा म्युझिकल स्टार्स,

२८ फेब्रुवारी –  ‘फोक संस्कृती’

 १ मार्च – द फोक लावणी’

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!