spot_img
spot_img
spot_img

संकटावर मात करण्याची प्रेरणा स्वामी विवेकानंद यांच्याकडून – पद्मश्री मुरलीकांत पेटकर

शबनम न्यूज | प्रतिनिधी
जीवनात आलेल्या प्रत्येक संकटावर मात करून यशस्वी होण्यासाठीची प्रेरणा मला स्वामी विवेकानंद यांच्याकडून मिळाली. त्यांच्या प्रेरणेनेच मी दिव्यांगावर मात करू शकलो. ऑलिंपिकच्या कुस्ती, धनुर्विद्या, हॉकी यासह ॲथलेटिक मधील बहुतांशी सर्व खेळात सहभागी होऊन देशासाठी ४७६ पदके जिंकली त्यापैकी ४७४ सुवर्ण पदके आहेत. आजच्या युवा पिढीने स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या महान व्यक्तींचे जीवन चरित्र अभ्यासले पाहिजे असे मार्गदर्शन पॅरा ऑलम्पिक मध्ये सुवर्ण पदकांचे जागतिक रेकॉर्ड केलेले पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी केले. 
   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे ११ व्या “युवोत्सव” चे उद्घाटन पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते करण्यात आले. 
    यावेळी एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर, शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. रूपाली कुदरे, प्रा. स्वप्निल सोनकांबळे, समन्वयक डॉ. अमरीश पद्मा, डॉ. ऋषिकेश कुमार, पूर्वा साने तसेच अहिल्यानगर, बारामती, पुणे शहर, पुणे ग्रामीण भागांतून या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या संघातील खेळाडू आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पेटकर यांच्या जीवन प्रवासा वरील  चित्रफीत दाखविण्यात आली.
   यावेळी पेटकर यांचे ओएसडी कपिल मिसाळ यांनी पेटकर यांच्या आयुष्यातील खडतर प्रसंग आणि त्यांनी दिलेली झुंज, त्यांचे खेळांवर असलेले प्रेम, देशाबद्दल अपार निष्ठा, विविध पॅरा ऑलिंपिक स्पर्धेमध्ये त्यांनी मिळवलेली सुवर्णपदके यांची माहिती दिली.
   डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी स्वागत प्रास्ताविक करताना सांगितले की, पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचा जीवनप्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. जेव्हा जीवनात एखादा मार्ग बंद होतो तेव्हा प्रयत्नांनी दुसरा यशाचा मार्ग काढता येतो. हेच तत्व व्यवस्थापन क्षेत्रात देखील लागू होते.
   “युवोत्सव” स्पर्धेत फुटबॉल मध्ये ३४ संघ, व्हॉलीबॉल मध्ये २४ संघ, बॉक्स क्रिकेट (मुले) २० संघ, बॉक्स क्रिकेट (मुली) १२ संघ तसेच आयपीएल ऑक्शन मध्ये १० संघ सहभागी झाले आहेत. यासाठी ९ प्रायोजकांचे सहकार्य आणि लिबास कलेक्शन, गगनगिरी फूड्स, रेड बुल, याकुल्ट, व्ही लुक अप यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. 
  प्रशांत सायस, सिद्धेश जामोडे, वैभव वाघरे, धीरज सोनार, ऋषिकेश मुक्कावर, गायत्री घुले, हर्षदा बाबर, कुणाल निकम व अजय गिट्टे यांनी आयोजनात सहभाग घेतला आहे.
     सूत्रसंचालन आर्या देशमुख, आभार रिया बन्सल यांनी मानले.
     पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सहभागी संघाना शुभेच्छा दिल्या.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!