spot_img
spot_img
spot_img

आ. शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा आढावा बैठक संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरण सेक्टर २३ येथे पाणीपुरवठा विभागासमवेत सविस्तर आढावा बैठक पार पडली. ही बैठक पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. यावेळी बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन (नगरसेवक तथा सदस्य, स्थायी समिती) यांनी अनेक पाणीपुरवठ्याशी संबंधित विविध समस्या मांडल्या.

बैठकीत रहाटणी – तापकीर नगर, प्रभाग क्र. २७ मधील पाणीपुरवठ्याशी संबंधित विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. मार्च ते मे या उन्हाळी कालावधीत वाढणाऱ्या पाणीटंचाईच्या तक्रारींचा विचार करून पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम, शाश्वत व नियोजनबद्ध करण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

प्रभागातील बैठी घरे तसेच सर्व गृहनिर्माण सोसायट्यांसाठी स्वतंत्र व दीर्घकालीन पाणीपुरवठा आराखडा तयार करण्यावर विशेष भर देण्यात आला. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून भविष्यातील गरजांसाठी आतापासूनच ठोस नियोजन करणे अत्यावश्यक असल्याचे आमदार जगताप यांनी अधोरेखित केले.

तसेच सांडपाण्याचा पुनर्वापर सक्तीने राबविणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रभावीपणे अंमलात आणणे आणि उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. जलसंधारणाच्या उपाययोजनांमुळे दीर्घकालीन पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

रहाटणीकरांना नियमित, सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी प्रशासनाने समन्वयाने व जबाबदारीने कार्य करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

यावेळी स्थानिक पदाधिकारी, अधिकारी व नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!