spot_img
spot_img
spot_img

भोसरीत सशस्त्र घरफोडी; नागरिकांचा प्रतिकार, एक आरोपी अटकेत तर साथीदार फरार

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

भोसरी परिसरात सकाळच्या सुमारास सशस्त्र घरफोडीची धक्कादायक घटना घडली असून, नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७९/२०२६ नुसार महाराष्ट्र पोलीस कायदा, भारतीय न्याय संहिता तसेच आर्म अॅक्टअंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दि. २२/०२/२०२६ रोजी सकाळी ७.१५ ते ७.५० या वेळेत, पी.सी.एम.सी. चिल्ड्रन पार्कजवळ, चैतन्य पार्क, साईदर्शन बी विंग, इंद्रायणीनगर, भोसरी, पुणे येथे ही घटना घडली.

फिर्यादी धर्मेंद्र अमरेंद्र झा (वय ५३) यांच्या फ्लॅटची कडी व लॅच तोडून आरोपींनी घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाट व लॉकर उचकटून ५७,५०० रुपये रोख व चांदीची नाणी चोरून नेण्यात आली.

घरफोडीनंतर आरोपी मोटारसायकलवरून पळून जात असताना नागरिकांनी पाठलाग केला. यावेळी आरोपी सागरसिंग सुरजसिंग ऊर्फ फंटयास्टिक बावरी (अंधरेले) (रा. गुरुगोविंद सिंगनगर, जालना) व त्याच्या फरार साथीदाराने चाकू व पिस्टलचा धाक दाखवला. या झटापटीत सचिन ज्ञानेश्वर पिंगळे यांना चाकूचा वार होऊन हाताला दुखापत झाली, तर ध्वजशेर शाही यांना पकडताना झालेल्या झटापटीत जखम झाली.

घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी सागरसिंग अंधरेले याला दुपारी ४.५० वाजता अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

त्याचा साथीदार अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. फरार आरोपीकडे पिस्टल (मॅगझीन नसलेली) व चाकू असल्याची माहिती आहे.

अटक आरोपीवर यापूर्वी जालना जिल्ह्यात घरफोडी व चोरीचे १५ हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली असून फॉरेन्सिक व्हॅनचाही वापर करण्यात आला आहे.

पुढील तपास भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुहास खाडे करत आहेत.

पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे व संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!