शबनम न्यूज | प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी अजित राजेंद्र तावरे याची (ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी ) विषाखापट्टणम (आंध्रप्रदेश ) येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 28/02/2026 ते 04/03/2026 रोजी विषाखापट्टणम (आंध्रप्रदेश ) येथे होणार असून देशभरातील विविध विद्यापीठांतील स्पर्धक यात सहभागी होणार आहेत.
सदर विद्यार्थ्याने नियमित सराव, संतुलित आहार व मार्गदर्शक डॉ. संतोष भुजबळ (आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक व कोच) यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर मेहनत घेतली. त्याच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे, चेअरमन मा. श्री चंद्रकांत दळवी साहेब, सचिव, मा. श्री विकास देशमुख साहेब, मा. श्री सदाशिवराव बापू सातव साहेब, मा. ॲड. राम कांडगे साहेब, मा. श्री दत्तात्रय गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेचे, पश्चिम विभागीय अधिकारी, मा. श्री संजय मोहिते साहेब आणि उपविभागीय अधिकारी मा. श्री दत्तात्रय गायकवाड साहेब, महाविद्यालयाचे मा. प्र. प्राचार्य डॉ. प्रभंजन चव्हाण, क्रीडा संचालक डॉ. संतोष भुजबळ, IQAC समन्वयक डॉ. सविता पाटील व सर्व प्राध्यापकांनी त्याचे अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


