पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
निगडी पोलीस ठाण्यात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निगडी गुन्हा क्रमांक १२६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (डी) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
फिर्यादी पुरुष, दि. ०२/०१/२०२६ रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास कार्यालयात असताना, बजाज ऑटो लिमिटेड, आकुर्डी, पुणे येथे कार्यरत असताना, आरोपी विकास कुमार (मो. नं. ९१७३१७६३८३ / ९७९८०६१३६३) याने संपर्क साधला. तुमचे MNGL गॅस बिल थकीत असल्याचे सांगून आरोपीने ‘Bill Update’ नावाची APK फाईल पाठवली.
ही फाईल इन्स्टॉल केल्यानंतर फिर्यादीच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण १,१५,२३५ रुपये ऑनलाईन पद्धतीने वळते करण्यात आले.
या प्रकरणात संबंधित बँक खातेदार तसेच आरोपीला मदत करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या कोणतीही अटक झालेली नाही.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनसोडे करत आहेत.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना अशा प्रकारच्या APK फाईल्स, अनोळखी कॉल्स व लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.


