spot_img
spot_img
spot_img

इंस्टाग्राम-व्हॉटसॲप गुंतवणूक आमिषातून ३०.७० लाखांची ऑनलाईन फसवणूक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

सांगवी पोलीस ठाण्यात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा क्रमांक ६५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६ (२), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (डी) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

दि. ०८/०६/२०२५ ते २८/०६/२०२५ या कालावधीत, ओ-४-बी-४०५, सिद्धीविनायक जिंजर, पिंपळे सौदागर, पुणे ४११०२७ येथे राहणारे पुरुष फिर्यादी हे Instagram वर रिल्स पाहत असताना C-360 ONE Insight Exchange Group या नावाच्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड झाले.

ग्रुपमधील आरोपी अंजली शर्मा (मो. ९६६०६२२३१४, ९४६२१२१३४७, ७९७५५७९३२७, ८९७७१२१४३१) व करण भगत (मो. ९६१८१९९३०२, ८५४६०८७२८७) यांनी फिर्यादीस “360 ONE HNW” नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगून त्यात पैसे गुंतवण्यास भाग पाडले.

आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये रक्कम भरण्यास सांगण्यात आले.

यानंतर आरोपींनी व्हॉटसॲपवर सातत्याने संदेश पाठवून कंपनी व शेअर बाजारात मोठा नफा होत असल्याचे भासवले. परंतु प्रॉफिटमधील परतावा न देता विश्वासघात करून एकूण ३०,७०,६०६ रुपये इतकी रक्कम फसवणूक करून हडप केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणात संबंधित बँक खातेदारांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या कोणतीही अटक झालेली नाही.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळी करत आहेत.

नागरिकांनी सोशल मीडियावरील गुंतवणूक आमिषांना बळी न पडता अनोळखी अॅप्स, लिंक व ग्रुप्सपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!