पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांविरोधात कारवाई करत पोलिसांनी एका तरुणाला गांजासह अटक केली आहे.
या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक १३२/२०२६ नुसार एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २३/०२/२०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता, सदगुरु मिसळ हॉटेल जवळील मोकळ्या जागेत, महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे येथे सार्वजनिक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
सायंकाळी ९.५९ वाजण्याच्या सुमारास पोलीस शिपाई महेश नामदेव गायकवाड (बक्कल नं. ३२०६) यांना मिळालेल्या माहितीनुसार ही छापा कारवाई करण्यात आली.
यावेळी आरोपी चंदन मंजित सिंह (वय २२ वर्षे, मूळ रा. डुमरी, ता. रसडा, जि. बलीया, राज्य उत्तरप्रदेश; सध्या रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे) याच्या ताब्यातून ८८४ ग्रॅम वजनाचा, अंदाजे ४४,५०० रुपये किमतीचा गांजा बेकायदेशीररीत्या बाळगताना मिळून आला. त्यामुळे त्यास तात्काळ अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी सरकार पक्षातर्फे एन.डी.पी.एस. अॅक्टनुसार फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जायभाये करत आहेत. पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.


