पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
उत्तर चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतीच्या विहिरीतील पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून मारहाण, शिवीगाळ व धमकीची घटना घडली आहे.
या प्रकरणी उत्तर चाकण गुन्हा क्रमांक १९६/२०२६ नुसार बी.एन.एस. कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. २२/०२/२०२६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास, पवळे वस्ती, काळुस, ता. खेड, जि. पुणे येथे घडली. याप्रकरणी महिला फिर्यादी असून आरोपी म्हणून सार्थक तानाजी पवळे (रा. काळुस पवळेवाडी, ता. खेड, जि. पुणे) व एक महिला आरोपी यांचा समावेश आहे. सध्या कोणतीही अटक करण्यात आलेली नाही.
तक्रारीनुसार, आरोपी त्यांच्या शेतीला मोटारीने विहिरीचे पाणी भरत असताना फिर्यादी यांनी “आज रविवार असून शेतीला पाणी भरण्याची आमची पाळी आहे” असे सांगितले.
याच कारणावरून आरोपी क्रमांक १ याने फिर्यादीचे पती हिम्मतराव पवळे यांना हातातील काठीने छातीवर मारहाण केली. त्याचवेळी आरोपी क्रमांक २ हिने फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी केली.
फिर्यादी भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता आरोपी क्रमांक १ याने दगडाने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटावर मारून जखमी केले तसेच कानावर हाताने थापड मारली. यावेळी फिर्यादीच्या पतीस धक्काबुक्की करत “तुझी विकेट टाकीन” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपी क्रमांक २ हिनेही शिवीगाळ व धमकी दिल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कोळेकर करत आहेत.


