पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
तळेगाव दाभाडे परिसरात सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करून नागरिकांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६/२०२६ नुसार अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
दि. २३/०२/२०२६ रोजी सायंकाळी ५.५५ वाजण्याच्या सुमारास, तळेगाव दाभाडे, जुना पुणे–मुंबई महामार्गावरील सीआरपीएफ गेट क्रमांक ३ समोरील वडाच्या झाडाखाली ही घटना घडली. याबाबत रात्री ८.३६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, संबंधित महिला आरोपी हिने वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी लैंगिक हावभाव करून अश्लील शब्द उच्चारले. त्यामुळे ये–जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण झाला असून सार्वजनिक शिष्टाचार व सभ्यतेचा भंग झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. सदर प्रकरणात महिला आरोपी अटक नाही.
या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड येथील पोलीस हवालदार उदयकुमार बाळासाहेब भोसले (वय ३९, ब.नं. १७९०) यांनी सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार तोडकर (ब.नं. १८६१) करत आहेत.
पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी शिस्त व सभ्यता राखण्याचे आवाहन नागरिकांना केले असून अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.


