spot_img
spot_img
spot_img

हिंजवडी फेज–१ मध्ये अल्पवयीन मुलीच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट जबरदस्तीने चोरणाऱ्या आरोपीस अटक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १०८/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) अन्वये, हिंजवडी फेज–१ परिसरात जबरदस्ती चोरीची घटना उघडकीस आली आहे.

दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२.०५ ते दुपारी ०२.०० वाजण्याच्या दरम्यान नारायण कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमधून, हिंजवडी फेज–१, ता. मुळशी, जि. पुणे येथे ही घटना घडली.

दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ००.१७ वाजता याबाबत तक्रार दाखल करण्यात आली.

फिर्यादी यांच्या मुलगी आराध्या हिच्या गळ्यातील अर्धा ग्रॅम वजनाचे अंदाजे ६,००० रुपये किमतीचे काळ्या रंगाच्या गोफमध्ये असलेले सोन्याचे बदामयुक्त लॉकेट आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जबरदस्तीने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी किरण हनुमंत कांबळे (वय २२, रा. शिंदेवस्ती, मारुंजी; मूळ रा. बोरसाभुरशी, ता. चिखली, जि. बुलढाणा) व अमोल मोहन जाधव (वय २३, रा. भक्तीशक्ती नगर, भांजी मंडई जवळ, चिखली, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वांगणेकर करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!