spot_img
spot_img
spot_img

काळेवाडी–पवारनगर येथे जुगार अड्ड्यावर धाड; सहा जणांवर गुन्हा दाखल, रोख रक्कम जप्त

शबनम न्यूज | प्रतिनिधी

काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवारनगर येथील सुर्यमुखी गणेश मंदिराजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सहा जणांवर कारवाई केली आहे.

या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७१/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४, ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.५० वाजण्याच्या सुमारास स्टार लाईन समोरच्या गल्लीत असलेल्या चाळीतील शेवटच्या खोलीत तीन पत्ती नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार सायंकाळी ७.४० वाजता पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी हे पैसे लावून जुगार खेळत असल्याचे आढळून आले.

या कारवाईत
१) शैलेश मदनिकांत शर्मा (वय ?४०, रा. रसिकवाडी जांबे ता. मुळशी जि. पुणे),
२) अशोक सोनाजी वडमारे (वय ६५, रा. पवारनगर कळवाडी फाटा, धेरगाव पुणे),
३) संजय मच्छिंद्र मिसाळ (वय ४५, रा. म्हातोबानगर),
४) शब्बर नसीर हवालदार (वय ३६, रा. माने शाळा तापकीस मळा कळवाडी पुणे),
५) अक्रम दिलदार खान (वय ५५, रा. ड्रायव्हर कॉलनी काळेवाडी फाटा, धेरगाव पुणे),
६) दुर्गाराम रुपाराम पटेल (रा. रूम नं. ५, पवार यांचे भाड्याचे खोलीत, सुर्यमुखी गणेश मंदिराजवळ, पवारनगर धेरगाव पुणे)
यांचा समावेश आहे.

छाप्यात पोलिसांनी रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असे एकूण ५,१२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तसेच आरोपी दुर्गाराम रुपाराम पटेल याने जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सदर कारवाई पोलीस हवालदार तुषार अशोक शेटे (गुन्हे शाखा युनिट-२, पिंपरी-चिंचवड) यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!