spot_img
spot_img
spot_img

हिंजवडीत घरगुती वादातून पत्नीवर चाकूने हल्ला; पती अटकेत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

हिंजवडी परिसरात घरगुती वादातून पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या प्रकरणी महेंद्र सोपान कांबळे (वय ३५, व्यवसाय सिक्युरिटी गार्ड, रा. किरण येवडे यांची रूम, येवडेवस्ती, लक्ष्मी चौक, हिंजवडी, पुणे) यास पोलिसांनी अटक केली आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११४(२), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास किरण येवडे यांच्या रूममध्ये ही घटना घडली.

फिर्यादी महिला व त्यांचा पती महेंद्र कांबळे यांचा मुलगा प्रतीक याच्याशी शैक्षणिक बाबींवरून जोरदार वाद सुरू होता.

हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादी मध्ये पडली असता आरोपी पतीला राग अनावर झाला.

रागाच्या भरात आरोपीने घरातील लाकडी टेबलावर ठेवलेला भाजी कापण्याचा चाकू हातात घेऊन “तुला आता जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत फिर्यादी महिलेच्या पोटात चाकूने भोसकून गंभीर जखमी केले.

जखमी महिलेवर तातडीने उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस अटक केली. पुढील तपास पोलीस नाईक मोरे करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!