spot_img
spot_img
spot_img

हिंजवडी–वाकड येथे रस्ते अपघातानंतर मारहाण; एकास अटक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाकड येथील भुमकर चौक ब्रिजजवळ मुंबई–पुणे महामार्गावरील सर्व्हिस रोडवर रस्ते अपघातानंतर झालेल्या वादातून चालकास शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी संभाजी किसन सकपाळ (वय ४५, रा. मॅजेस्टिक सोसायटी, शनिमंदिर रोड, वाकड, पुणे) यास पोलिसांनी अटक केली आहे.

त्याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १०५/२०२६ नुसार बी.एन.एस. कायदा कलम ११८ (२), ३५१ (२), ३५२, ३२८ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास भुमकर चौक ब्रिजजवळ अपघात झाला. फिर्यादी विशाल पंडरीनाथ जाधव (वय ४३, व्यवसाय ड्रायव्हर, रा. साई मंदिरा बाजूला, हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे) हे बजाज कंपनीच्या ऑटो रिक्षा क्रमांक एम.एच. १४ के.यू. ५७०६ चालवत असताना पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची इंडिगो कार क्रमांक एम.एच. १४ के.यू. १९९६ यांच्यात अपघात झाला.

अपघातानंतर कार चालक संभाजी सकपाळ याने “तुला कसले रे नुकसान झाले आहे, माझ्या गाडीचे पण नुकसान झाले आहे. तुला माहित आहे का मी कोण आहे, तुला बघून घेतो,” अशी धमकी देत फिर्यादीस शिवीगाळ केली.

त्यानंतर लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या कोपरावर जोरात मारहाण करून गंभीर दुखापत केली.

या घटनेनंतर हिंजवडी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सपोनि चौधरी करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!