spot_img
spot_img
spot_img

श्री साईबाबा मंदिराचा २६ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सोमवार पेठ, माळी महाराज मठाशेजारी धायरकर वाडा येथे श्री साईबाबा मंदिर यांचा २६ वा वर्धापन दिन मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात संपन्न झाला.

वर्धापन दिनानिमित्त पहाटे श्रींची काकड आरती आणि नगारा वादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर गणपती पूजन, पुष्यवचन, नवग्रह पूजन, गुरु पूजन, दत्तयाग, साई सत्यनारायण पूजन आणि श्रींची शेजारती असे विविध धार्मिक विधी पार पडले. संपूर्ण परिसर साईनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता.

धार्मिक कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

सायंकाळी लुई अंध-अपंग कल्याण संस्था यांच्या वतीने “आज की शाम साई के नाम” या मधुर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भक्तिगीतांच्या सादरीकरणाने वातावरण अधिकच भक्तिमय झाले.

या सोहळ्यास मंदिराचे पुजारी राजेंद्र धायरकर, स्वप्निल धायरकर, अभिजीत धायरकर, सुरेखा धायरकर, पुनम बरके, भाग्यश्री धायरकर यांच्यासह नगरसेविका कल्पना बहिरट, राजेंद्र रासकर, किरण रासकर, ओंकार भोजने, अमोल बनकर, सनी गायकवाड, आर्यन बरके, आदेश बरके, श्रवण कोल्हे, आर्य धायरकर, पूर्वा कोल्हे, शालन भोजने, आरोही धायरकर, अन्वी धायरकर, सनी जाधव, विशाल बुरडे, अमोल लडकत आदी मान्यवर उपस्थित होते.

भक्तीमय वातावरणात पार पडलेला हा वर्धापन दिन सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!