spot_img
spot_img
spot_img

सायबर सुरक्षा क्षेत्रात युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध – डॉ. दीपक शिकारपूर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सायबर सुरक्षा हे प्रचंड वेगाने विस्तार होत असलेले व्यापक क्षेत्र क्षेत्र असून या क्षेत्रात युवा पिढीसाठी मोठ्या प्रमाणावर नवीन रोजगार संधी उपलब्ध होत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणकतज्ञ डॉ.दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले.यशस्वी स्किल्स लिमिटेड डिजिटल टास्क फोर्स व थिंक स्पार्क कन्सल्टन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सायबर सिक्युरिटी सायबर क्राईम इन्वेस्टीगेशन अँड डिजिटल फोरेन सिक्स अभ्यासक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
चिंचवड येथील यशस्वी भवन येथे आयोजित या कार्यक्रमात बोलताना यावेळी ते म्हणाले की,युवा पिढीने उज्वल करिअरसाठी केवळ पदवी शिक्षणावर अवलंबून न राहता पदवी शिक्षण घेत असतानाच सायबर सुरक्षा तंत्रज्ञानाच्या कौशल्य अभ्यासक्रमांचा अंगीकार करायला हवा. सायबर क्राईम इन्वेस्टीगेशन आणि डिजिटल फॉरेन्सिक्स क्षेत्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकून स्वतःला स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी अद्ययावत करायला हवे, असेही शिकारपूर यांनी सांगितले.तसेच युवा पिढीने जपानी भाषा अवगत करून भारतीय तरुणांसाठी जपानमध्ये मोठ्या संख्येने उपलब्ध असलेल्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यायला हवा, असे आवाहनही शिकारपूर यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे त्यांच्या मनोगतात म्हणाले की, सायबर गुन्ह्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली असताना दुसरीकडे या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी सायबर सुरक्षेचा पुरेसं ज्ञान असणारे मनुष्यबळ कमी आहे.त्यामुळे या क्षेत्रातील कौशल्य आणि सखोल ज्ञान असणारे कुशल मनुष्यबळ तयार होणं ही काळाची गरज आहे.त्यावेळी बोलताना विविध उदाहरणांचे दाखले देत त्यांनी सायबर गुन्ह्यांची तीव्रता आणि व्याप्ती किती भयावह झाली आहे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सायबर गुन्ह्यांना अटकाव घालण्यासाठी युवा पिढीने सायबर योद्धा कोर्स द्वारे स्वतःला सज्ज करावं असे आवाहन भानुप्रताप बर्गे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स चे डॉ. शिवाजी मुंढे यांनी हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यामागील संस्थेची भूमिका विशद करत अभ्यासक्रमांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.तर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात यशस्वी संस्थेचे मुख्य प्रशिक्षण अधिकारी राजेश नागरे यांनी सायबर सुरक्षा च्या अभ्यासक्रमाविषयी संक्षिप्त माहिती विद्यार्थ्यांना सादरीकरणाद्वारे दिली.
या कार्यक्रमात डिजिटल टास्क फोर्स चे संस्थापक डॉ. रोहन न्यायाधीश व त्यांच्या सहकाऱ्यांनी क्यू आर कोड द्वारे कशाप्रकारे सहजगत्या मोबाईल हॅक केला जातो याचे प्रात्यक्षिकासह उदाहरण देत आपली डिजिटल ओळख सुरक्षित ठेवावी आणि कोणतीही व्यक्तिगत माहिती सार्वजनिक समाज माध्यमावर उपलब्ध होणार नाही याबाबत दक्षता बाळगावी असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
या कार्यक्रमाला थिंक स्पार्क कन्सल्टन्सीच्या प्रमुख नेहा शिंदे, यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ, डिजिटल टास्क फोर्स संस्थेचे पदाधिकारी तसेच यशस्वी संस्थेचे प्राध्यापक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!