शबनम न्यूज | प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आकुर्डी येथे विठ्ठल प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण १२६ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेची सेवा केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका वैशालीताई काळभोर, नगरसेविका अरुणाताई लंगोटे, माजी नगरसेवक मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते अशोकदादा वायकर, युवा नेते विशाल यादव, उद्योजक सोमनाथदादा काळभोर, मोहननगर शिवसेना शाखाप्रमुख नागेश नामदेव अण्णा कुराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच जावळे मामा, आशाताई शिंदे, शिवराज रणनवरे, प्रवीण पाटील, राहुल पालांडे, संदेश जगताप, राजीव मेनन आणि रोहित सोनवणे आदींचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना आकुर्डी विभाग प्रमुख गोविंद शिंदे, दीप्ती काळभोर आणि मानसी ननावरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे संयोजन ऋषिकेश घोरपडे, किशोर शिंदे आणि श्री. तोरणे यांनी केले.
या उपक्रमाचे आयोजन विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निखिल दळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शिवजयंतीच्या पवित्र निमित्ताने आयोजित या रक्तदान शिबिरातून समाजसेवेचा आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला.


